'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण1 च्या राजू भडकेच्या अथक प्रयत्नांनी ग्राममंगलच्या शाळेस शासन मान्यता प्राप्त


निर्माण 1 चा राजू भडके मागील ३ वर्षापासून ऐना, ग्राममंगल येथे शाळेचे कामकाज बघत आहे.
ग्राममंगल संस्थेने २००१ साली ठाणे जिल्हातील विक्रमगढ तालुक्यात शाळा सुरु केली. सदर शाळेसाठी सरकार कडून मान्यता मिळण्यासाठी त्यांनी २००३ मध्ये अर्जही केला होता. पण ग्राममंगलकडून पाठपुरावा न झाल्याने गेले अनेक वर्ष ते काम यशस्वी झाले नव्हते. राजूने हे आव्हान स्विकारले. आणि मागील एक वर्षापासून या प्रकरणात लक्ष घालून या महिन्यात मुंबई येथून त्याने शाळेला  मान्यता मिळवून दिली. शाळेचे दैनदिन काम, व्हीजीटर्स, प्रशिक्षण, मुलांना शिकवणे, इ. कामे सांभाळून राजूने  केलेल्या या कामगिरीबद्दल निर्माण परिवारातर्फे त्याचे खूप अभिनंदन आणि शाळेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा!


No comments:

Post a Comment