'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

शोधग्राममधील शस्त्रक्रियेसाठी निर्माणच्या 12 डॉक्टरांची उपस्थिती

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सर्चमध्ये 26 ते 28 मार्चदरम्यान सर्जरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, राजनांदगाव येथून आलेल्या एकूण 97 रुग़्णांवर शस्त्रक्रिया  करण्यात आली. शिबिरादरम्यान प्रामूख्याने हार्निया, हायड्रोसिल, गर्भाशय, मूत्रखडा आणि थायरॉईडच्या विकारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेसाठी अकोला, सांगली, कोल्हापूर, सातारा, मुंबई येथून एकूण 17 डॉक्टर्सेची टीम आली होती. यात भूलतज्ञ, शल्यविशारद, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ यांचा समावेश होता. निर्माणच्या महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या एकूण 12 डॉक्टरांनी शिबिरादरम्यान मदत केली. प्रामुख्याने यवतमाळ, मुंबई आणि पुणे या भागातून हे तरुण आले होते. या शिबिरादरम्यान काही वेगळ्या केसेस पाहायला मिळाल्या आणि निर्माणच्या विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा चांगला अनुभव राहिला. मक्केपायलीच्या एका महिलेवर शस्त्रक्रिया करुन 4 किलोचा स्तनाजवळील गोळा काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया जवळजवळ 3-4 तास चालली. पण अखेरीस आपल्या डॉक्टरांच्या मदतीने ती अखेर यशस्वीपणे पार पडली. तसेच नऊ महिन्याच्या बाळाच्या आकाराचा गर्भाशयातील गोळाही शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आला. बाहेरुन आलेले डॉक्टर्स, आपले सर्चचे डॉक्टर डॉ.योगेश, डॉ. वैभव, डॉ. भाग्यश्री, डॉ. ज्योती, निर्माणचे तरुण आणि परिचारिका यांच्या गेल्या दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी कुठल्याही गुंतागुंत आणि गोंधळाशिवाय हे शिबिर सुरळित पार पडले. सर्चमधील डॉक्टरांनी निर्माणच्या डॉक्टरांचे कामाबद्दल खूप कौतुक केले. संपूर्ण गटाचे निर्माण परिवारातर्फे मनापासून अभिनंदन!

No comments:

Post a comment