'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 2 च्या संतोष गवळेची ‘भारत निर्माण’ उपक्रमाच्या महाराष्ट्र समन्वयकपदी निवड

केंद्र शासनाच्या ‘भारत निर्माण’ योजनेची अंमलबजावणी, महाराष्ट्रात ‘यशदा’ संस्थेमार्फत होणार  आहे. या योजनेचा पहिल्या टप्प्यात, महाराष्ट्रातील निवडक १० जिल्ह्यांमधील, प्रत्येक तालुक्यातील ७ गावांना फायदा होणार आहे. या निवडक गावांतील दर २५ कुटुंबांमागे एक असा ‘भारत निर्माण सेवक’ गावातूनच निवडण्यात येणार आहे. या २५ कुटुंबांचे सरकारी काम पार पाडणे, त्यांना विविध योजनांची माहिती मिळवून देणे अशी कामे निवडलेल्या ‘भारत निर्माण सेवकाने’ ग्रामपंचायतीमार्फत करून घेणे अपेक्षित आहे. या कामासाठी सेवकांना कुठलेही मानधन मिळणार नसून हे काम संपूर्णपणे स्वयंसेवकासारखे करायचे आहे. या योजनेचा पायलट सांगली जिल्ह्यातील, वाळवा तालुक्यातील, किल्ले मच्छिंद्रगड व वर्धा जिल्ह्याच्या देऊळी तालुक्यातील एका गावात यशस्वीपणे पार पडला आहे. ही योजना भारतभर राबवण्याचा केंद्र सरकारची इच्छा असून त्याप्रमाणे आंध्रप्रदेश मध्ये कामला सुरुवात देखील झाली आहे. एकूण १०,००० भारत निर्माण सेवक तयार करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. या सर्व भारत निर्माण सेवकांचे समन्वय करण्यासाठी संतोष गावळे ह्या आपल्या मित्राची महाराष्ट्र समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. संतोष आपल्या मन्याळी गावातील काम सांभाळून ‘यशदा’बरोबर काम करणार आहे. संतोषचे मनःपूर्वक अभिनंदन.

No comments:

Post a Comment