'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

मन्याळी तांड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यात निर्माण 2 च्या संतोष गवळेला यश

विहिरीची पाहणी करताना विकास नाडकर्णी, नंदा खरे, संतोष व त्याचे सहकारी
उमरखेड तालुक्यातील मन्याळी या गावात दीड वर्षापासून निर्माण 2 चा संतोष गवळे पाणी प्रश्नावर काम करत आहे. या गावात व गावालगत दोन किमीवर असणार्‍या तांड्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई! मन्याळी गावात लोकवर्गणी आणि श्रमदानातून विहिर खोदून काढण्यात आली. गावचा पाण्याचा प्रश्न सुटला. तांड्यातला पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने संतोषने प्रयत्न चालू केले. तांड्यापासून दीड किमी अंतरावर विहीर खोदण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. त्यासाठी उत्तम भूरा जाधव या अल्पभूधारक शेतकर्‍याने तीन गुंठे जमीन विहिरीसाठी दान दिली. प्रत्येक घराला पाचशे रुपये याप्रमाणे 50 हजार लोकवर्ग़णी जमा झाली व पंधरा फुटबॉल विहीर खोदून झाली. विहीर तलावालगत असल्यामुळे पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बाकीच्या खोदकाम व बांधकामासाठी निधीची गरज होती. सहा लाख रुपयांचा हा निधी रोजगार हमी योजनेतून मंजूर झाला आणि खोदकाम सुरु झाले. लोकसहभागातून गावपातळीवरील काम यशस्वीपणे कसे घडवून आणता येते याचे एक उत्तम उदाहरण संतोष आणि त्याच्या सहकार्‍यांनी समोर ठेवले आहे. याबद्दल संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!

No comments:

Post a Comment