'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 2 च्या सागर अत्रेला ‘साऊथ एशियन जर्नलिस्ट असोसिएशन’ची मानाची शिष्यवृत्ती प्राप्त


निर्माण 2 चा सागर अत्रे गेले 10 महिने अमेरिकेतील ‘ओहायो’ या विद्यापीठात पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याला नुकतीच साऊथ एशियन जर्नलिस्ट असोसिएशन’ची मानाची शिष्यवृत्ती मिळाली असून त्याचा सोहळा 17 जुलैला ‘वॉशिंग्टन डीसी’ येथे अमेरिकेतील नावाजलेल्या पत्रकारांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. ‘साऊथ एशियन जर्नलिस्ट असोसिएशन’ ही संस्था अमेरिका आणि कॅनडा येथे स्थायिक झालेल्या पण मूळच्या आशियातील पत्रकारांनी स्थापन केली आहे. अमेरिका आणि कॅनडातील पत्रकारांसाठी विविध कार्यशाळांचे आणि मार्गदर्शनपर अभ्याससत्रांचे आयोजन करणे, त्यांना लिखाणासंबंधी संधी उपलब्ध करुन देणे, आशियातील विविध समस्या लोकांसमोर आणण्यासाठी त्यांना सहाय्य करणे असे अनेक उपक्रम या संस्थेतर्फे आयोजित केले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी 5 महाविद्यालयीन, 5 पदवीपूर्व आणि 5 पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या मूळ साऊथ एशियन विद्यार्थांना शिष्य़वृती प्रदान केली जाते. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार या देशांमधून आलेल्या 250 प्रवेश अर्जांमधून यावर्षीचा शिष्यवृतीचा सन्मान सागरला मिळाला आहे. या सोहळ्याला ‘न्युयॉर्क टाईम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असतील. या शिष्यवृत्तीच्या साहाय्याने दक्षिण आशियातील लोकांना भेडसावणार्‍या जागतिक संरक्षणाविषयीच्या समस्या तसेच तेथील धार्मिक वाद या दोन विषयांवर लिखाण करण्याची त्याची इच्छा आहे. सागरला त्याच्या या नवीन प्रवासाबद्द्ल निर्माण परिवारातर्फे खूप शुभेच्छा!

No comments:

Post a Comment