'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 2 च्या अमृता प्रधानचे ‘प्रयास’ संस्थेबरोबर काम सुरु


अमृता प्रधान
निर्माण २ च्या अमृता प्रधानने नुकतेच प्रयास ह्या पुण्यातील संस्थेमध्ये काम स्वीकारले आहे. प्रयासच्या संसाधने व उपजीविका ( Resources and livelihood ) या गटाचा भाग म्हणून अमृता काम करणार आहे. त्या अंतर्गत शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेसंदर्भात (JNNURM) तिचे काम असणार आहे. स्थानिक नागरी संस्थांना (urban local bodies)या योजनेअंतर्गत शासनाकडून विविध विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून घेता येतो. अशा स्थानिक संस्थांसोबत काम करून विकासाच्या कामाचे आराखडे बनवणे, त्यासाठी संशोधन करणे, लोकांचा सहभाग जमवण्यात मदत करणे असे तिच्या कामाचे स्वरूप असणार आहे. अमृताला तिच्या पुढील कामासाठी  शुभेच्छा!

No comments:

Post a Comment