'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 3 च्या प्रसाद सांडभोरची National Institute of Design मध्ये निवड

प्रसाद सांडभोर
निर्माण 3 च्या प्रसाद सांडभोर ने AISSMS- पुणे या कॉलेज मधून नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्याला खेळ व खेळणी यांच्या डिझाईनमध्ये व लहान मुलांच्या शिक्षणामध्ये विशेष रुची आहे.  यातच पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने भारतातील डिझाईनसाठी सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या  (National Institute of design) मध्ये प्रवेश घेतला आहे. त्याच्या अभ्यासाचा विषय Toy and Game Design असून गुजरातमधील गांधीनगर येथील शाखेत हा कोर्स घेण्यात येणार आहे. निर्माण परिवारातर्फे प्रसादचे अभिनंदन!

No comments:

Post a comment