'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 3 च्या तरुणांची बायफच्या जव्हार येथील उपक्रमाला भेटतन्मय जोशी
निर्माण 3 च्या मुक्ता नावरेकर, तन्मय जोशी, सागर जोशी आणि शैलजा तिवले यांनी नुकतीच जव्हार येथील बायफच्या उपक्रमाला भेट दिली. गेली 25 वर्षे बायफचे शेती व त्याच्याशी निगडित असणार्‍या अनेक विषयांत जवळपासच्या आदिवासी गावांमध्ये वाडी प्रकल्प, बचतगट इ.कामे सुरु आहेत. भेटीदरम्यान त्यांनी जवळच असलेल्या कळंबविहिर, वनवासी आणि रामाचा पाडा या गावांमधील वारली चित्रे तसेच पेपरपल्प पासून मुखवटे बनविणार्‍या काही कारागिरांच्या घरांना भेटी दिल्या. जव्हार परिसरातील या आदिवासींना त्यांच्या कलेच्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळवून देता येईल, त्यांच्या विविध वस्तूंना बाजारपेठ् कशारितीने उपलब्ध करुन देता येईल याचा अभ्यास करणे हा या भेटीमागचा उद्देश होता. नैसर्गिक रंगानी(माती,शेण) काढलेल्या या वारली चित्रातील त्यांच्या जीवनशैलीची अत्यंत सुरेख मांडणी येथे पाहायला मिळते. भेटीदरनंतर निर्माणचे तरुण या उपक्रमाला कशाप्रकारे मदत करू शकतात याचा विचार करताना खालील उपाय सुचले
  1. आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा नातेवाईक यांना वारली चित्र, पेपर पल्पच्या वस्तू भेट द्यायच्या असतील तर आपल्या मागणीनुसार(आकार व किंमत) तयार करुन मिळू शकतील.
  2. आपल्या माहितीतील अशा वस्तू विक्रीस ठेवणार्‍या विक्रेत्यांशी संपर्क करुन देणे किंवा विक्रीसाठी मोठया  प्रमाणावर अशा वस्तू बनवून घेणार्‍या लोकांशी संपर्क करून देणे

No comments:

Post a Comment