'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 3 च्या मेघा हजारेचे वाईतील ‘भारत विद्यालया’बरोबर काम सुरु


निर्माण ३ ची मेघा (नीलांबरी) हजारे हिने नुकतेच भारत विद्यालय या प्रायोगिक शाळेसाठी काम सुरु केले आहे. भारत विद्यालय’ या वाईमधील शाळेत मेंदू आधारित शिक्षणाच्या तत्वावर प्रयोगशील शिक्षणाचा प्रयत्न सुरु आहे. दारिद्र्यरेषेखालील मुलांना येथे मोफत शिक्षण दिले जाते. ही शाळा सध्या ८ वी पर्यंत आहे व येणाऱ्या प्रत्येक वर्षात एक-एक वर्ग वाढविला जात आहे. मुळची इलेक्ट्रोनिक्स टेलीकम्युनिकेशन या विषयात इंजिनियर असलेली मेघा ८ वी व ९ वी च्या वर्गांसाठी विज्ञानाच्या अभ्यासक्रमाची आखणी करीत आहे. मेंदू आधारित शिक्षणाच्या तत्वांनुसार ही आखणी होत असून, मुलांचे विज्ञान विषयातील मूलभूत ज्ञान पक्के व्हावे यावर भर दिला जात आहे. मेघाला तिच्या नवीन कामासाठी खूप शुभेच्छा.

No comments:

Post a comment