'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

निर्माण 4 चा ज्ञानेश मगर CIDA च्या प्रोजेक्टवर रिसर्च असिस्टन्ट म्हणून रुजू


निर्माण ४ चा ज्ञानेश मगर याने बी.एस्सी. (कॉम्प्युटर्) केल्यानंतर अल्पकाळ कॉर्पोरेट आयुष्याचा अनुभव घेऊन पाहिला. निर्माणच्या शिबिरांदरम्यान त्याचा नायना व निखिल जोशीशी संवाद झाला. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण लोकांकरता केला पाहिजे ह्या निर्णयापर्यंत तो पोहोचला. धुळे जिल्ह्यातील केसवानी ट्रस्ट सोबत नुकताच तो CIDA (Canadian International Development Agency) ने फंड केलेल्या एका प्रोजेक्टवर रुजू झाला आहे.
केसवानी ट्रस्टने शारदा नेत्रालय व महाराष्ट्र सेवा समितीच्या सहाय्याने धुळे जिल्ह्यातील विविध शालेय मुलामुलींपर्यंत पोहचून त्यांच्या डोळ्याच्या आरोग्यासंबंधी समस्या निवारण करण्याचे काम हाती घेतले आहे. ह्या प्रोग्राम मध्ये ऑगस्ट २०१७ पर्यंत ४०,००० शालेय मुलामुलींपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे टार्गेट आहे. ह्यासाठी दोन मोबाईल क्लिनिक्स स्थापन करण्यात आले असून प्रत्येक मोबाईल क्लिनिक मध्ये १ टेक्निशियन, १ ड्रायव्हर , १ Optometrist  व दोन कौन्सिलर नियुक्त केले गेले आहेत. या उपक्रमाअंतर्गत मुलांचे डोळे तपासणे, चष्मा लागला असल्यास नंबर सांगणे, मोफत चष्मा वाटप तसेच मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाते. ह्या सर्व पेशंट्सचा फिल्डवर्कचा डेटा गोळा करुन त्याचे विश्लेषण करणे व CIDA साठी कामासंबंधीचे अहवाल बनवणे हे ज्ञानेशचे काम आहे.

No comments:

Post a Comment