'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या अजय होलेचा रोजगार हमी योजनेच्या social audit च्या कामाच्या निमित्ताने नंदूरबारला अभ्यासदौरा


आंध्रप्रदेश सरकारतर्फे राबवल्या जाणार्‍या रोजगार हमी योजनेकडे एक आदर्श मॉडेल म्हणून पाहिले जाते. याअंतर्गत येणार्‍या social audit या पध्दतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी निर्माण 4 च्या अजय होलेने जानेवारीमध्ये नाशिक येथील प्रगती अभियानतर्फे हैदराबादचा दौरा केला. या भेटीनंतर प्रगती अभियानने तयार केलेल्या मॉडेलचा पायलेट नमुना आपल्या राज्यात कसा चालतो हे तपासण्यासाठी (pre-piloting) प्रगती अभियान, स्पर्श आणि आरोहण या स्वयंसेवी संस्थांनी नुकताच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा केला. प्रगती अभियानतर्फे अजयने नंदूरबार जिल्ह्यातील, अक्कलकूवा तालुक्यातील मोरांबा या गावाला या कामानिमित्ताने पाच दिवसांची भेट दिली. रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजित कामे कशी चालू आहेत हे लाभार्थींच्या दृष्टीने अभ्यासण्यासाठी त्यांनी प्रश्नावली बनवली आहे. ही प्रश्नावली त्यांनी मोरांबा गावातील 80-85 घरांवर लागू केली. या प्रश्नावलीअंतर्गत त्यांनी 2010- 2011 या दरम्यान गावात योजनेखाली झालेली कामे, त्याचा मिळालेला मोबदला याविषयी लोकांकडून माहिती मिळवली. हजेरीपुस्तिकेचे परिक्षण केले. तसेच त्यांनी दिलेली माहिती आणि इंटरनेटवर उपलब्ध करुन दिलेली माहिती  यात काही तफावत आहे का याचीही पडताळणी त्यांनी केली. या योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत काही समस्या असल्यास त्या जनसुनवाही अंतर्गत लोकांपुढे मांडणे कायद्यानुसार अनिवार्ये असते. मोरांबी गावची जनसुनवाई जवळून अभ्यासण्याची संधी या गटाला मिळाली. या जनसुनवाईदरम्यान BDO, गावाचा रोजगार हमी योजनेचा अधिकारी, गावातील लोक, आणि प्रगती अभियानचे कार्यकर्ते उपस्थित होते. लोकांनी मांडलेल्या गार्‍ह्याण्यांना सरकारी अधिकारी कसे सामोरे जातात याचे त्यांनी मुल्यांकन केले. Social audit ची पध्दत हा नवा प्रयोग असल्यामुळे हे राज्यभर लागू करायचे असल्यास काय अडचणी येऊ शकतात, त्यात काय सुधारणा अपेक्षित आहेत याचा आखोदेखी हाल अजयने अनुभवला. यात अजयला निर्माण 1 च्या गोपाल महाजनने सहाय्य केले. या pre-piloting च्या अनुभवावर आधारित निष्कर्षांचा त्यांनी अहवाल तयार केलेला असून एप्रिलपासून राज्यातील सहा ठिकाणी pilot सुरु होईल.

No comments:

Post a comment