'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या तेजश्री शेलारचे एम.डी प्रवेशपरिक्षेत यश


निर्माण 4 ची तेजश्री शेलार हिने पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बीएस चे शिक्षण पूर्ण केले असून पदव्व्यूत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने नुकतीच महाराष्ट राज्याची प्रवेशपरिक्षा दिली. यात संपूर्ण महाराष्ट्रात तिचा 334 वा क्रमांक आला आहे. गेले 5 महिने ती संगमेश्वर तालुक्यात एका प्राथमिक आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती कुठल्या शाखेत प्रवेश घेते हे निश्चित होईल. निर्माण परिवारातर्फे तेजश्रीचे हार्दिक अभिनंदन!  


No comments:

Post a Comment