'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या अद्वैत दंडवतेचे जळगावमध्ये युनिसेफ बरोबर काम सुरु


अद्वैत दंडवते
युनिसेफ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पोपुलेशन सायंसेस, पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट व महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण खात्याच्या संयुक्त विद्यमाने, ‘राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त योजनेचे’ मूल्यमापन करण्याचा प्रकल्प घेण्यात येत आहे. दोन वर्षाखालील मुले व त्यांच्या माता ह्यांचा हा सर्व्हे आहे. ह्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ८ टीम्स विविध पी.एस.यू च्या अखत्यारीतील १५ घरांचा (काही दुर्गम भागातील घरांचा व काही शहरातील झोपडपट्ट्यांचा) सर्व्हे करीत आहेत. एकूण ३००० samples घेणारे आहेत. निर्माण ४ चा अद्वैत दंडवते हा जळगांवच्या टीम सोबत हा सर्व्हे करीत आहे. ह्यामध्ये प्रत्येक महिलेला सरकारी योजने अंतर्गत मिळालेली मदत, आंगणवाडीचे सहाय्य, लसीकरण, पोषक आहार, अन्न, मुलांचे वजन, उंची, दंडघेर तसेच आईचे वजन, उंची इत्यादीची नोंद होणार आहे.

No comments:

Post a Comment