'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या मयूर सरोदेचा विज्ञान भारती संस्थेत, उर्जा व पर्यावरण विषयावर करण्याचा निर्णय

मयूर सरोदे
निर्माण ४ चा आपला मित्र मयूर सरोदे याने नुकतेच ‘व्ही. एन. आय. टी.’ या कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स या विषयात बी. टेक. पूर्ण केले. पहिल्यापासून अपारंपारिक उर्जेच्या विषयात रुची असणाऱ्या मयूरने नुकतेच विज्ञान भारती या राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या संस्थेबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. विज्ञान भारती संस्थेची NEED – National Environment and Energy Development Mission ही संलग्न संस्था आहे. या NEED संस्थेचे चार पातळींवर काम चालते -  पर्यावरण व उर्जेच्या संबंधित - १. कॉन्फरन्स घेणे २. मासिक चालवणे ३. ग्रामीण विद्युतीकरणाचे प्रकल्प राबवणे ४. उर्जा वाहिनी उपक्रम. उर्जा वाहिनी उपक्रमात विविध भागांतील शाळांमध्ये पर्यावरण विषयक विषयाच्या अभ्यासक्रमाची आखणी व नियोजन करणे व ते वर्ग चालवणे असे काम केले जाते. मयूरचे काम मुख्यत्वे उर्जा वाहिनी व ग्रामीण विद्युतीकरणासंबंधित असणार आहे. यासाठी मयूरला दिल्ली हे सेंटर मिळाले असून तो कामावर रुजू झाला आहे. त्याला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a comment