'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या शरद अष्टेकरच्या सोमनाथ येथील पुस्तक प्रदर्शनात ८६,००० रुपयांच्या पुस्तकांचा खप

निर्माण 4 च्या शरद अष्टेकर याने आपल्या ‘मायमराठी पुस्तक वितरण संस्थे’मार्फत वरोऱ्यातील सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबिरात पुस्तकांचे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाला शिबिरार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यादरम्यान एकूण ८६,००० रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. वैचारिक व सामाजिक आशयाच्या पुस्तकांची सर्वाधिक विक्री झाली. प्रदर्शनाच्या निमित्ताने निवडक पुस्तकांचे सामुहिक वाचन व चर्चा असे पूरक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले.  शरदला नुकतेच मौज, अक्षर, शब्द, मैत्रेय, साधना व बी गायडेड या सहा प्रकाशनांची, विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी वितरणाची जबाबदारी मिळाली आहे. या ११ जिल्ह्यांमधील लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्यांना पुस्तक वितरण करणे तसेच स्वत:ची पुस्तक प्रदर्शने अशी दुहेरी जबाबदारी तो आता सांभाळणार आहे. शरदला निर्माण परिवारातर्फे शुभेच्छा!

No comments:

Post a comment