'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

निर्माण 4 च्या संतोष गर्जेला अनाथालयासाठी आर्थिक मदतीची गरज


निर्माण ४ चा संतोष गर्जे हा गेवराई (जिल्हा बीड) येथे अनाथ मुलांसाठी एक अनाथाश्रम चालवतो. सध्या अनाथाश्रमात ४३ मुलांची काळजी घेतली जाते. मुलांची राहण्याची जेवणाची तशीच शिक्षणाची पूर्ण आर्थिक जबाबदारी संतोषवर आहे. मुलांना खाजगी शाळेत पाठवण्याची सोय संतोषने केली असून या सगळ्यांसाठी लागणारा निधी देखील संतोष एकहाती उभा करतो. सुरुवातीपासून अनाथाश्रम एका भाड्याच्या जागेत ७००० रुपये महिना एवढ्या भाड्यात सुरु होते. मात्र घरमालक सरकारी नोकरीतून नुकतेच निवृत्त होत असल्याकारणाने त्यांना  पैश्यांची चण – चण जाणवू लागली. त्यांनी संतोषला भाडे ७००० रुपयांवरून वाढवून २०००० करण्याची मागणी केली. तसेच अनाथाश्रमात कुणी यावे कधी यावे याबाबतही पूर्व परवानगी घेणे सक्तीचे केले. या त्रासाला कंटाळून संतोषने दुसरी जागा बघण्याचे ठरवले. त्याप्रमाणे अनाथाश्रम तात्पुरते एका नवीन जागेत स्थलांतरित झाले आहे. मात्र जागेचा प्रश्न कायमच संतोषपुढे आ वासून उभा राहणार आहे. यासाठी कुणाला आर्थिक मदत करण्याची इच्छा असल्यास संतोषला त्वरित संपर्क साधावा.
संतोष गर्जे  7588177979

No comments:

Post a comment