'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या डॉ. बाबासाहेब देशमुखच्या प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सोलापूरमध्ये साखर कारखान्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

बाबासाहेब देशमुख
निर्माण 4 चा डॉ. बाबासाहेब देशमुख मागच्या महिन्यापासून सोलापूरमधील म्हाडा जिल्ह्यातील ‘परिते’ या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. त्याने नुकतेच ‘विठठल’ आणि ‘कुरमदास’ या जवळच्या साखरकारखान्यांच्या उसतोडणी कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. एकदिवसीय शिबिरात दोन्ही कारखान्यांच्या मिळून एकूण 850 कामगारांनी भाग घेतला. त्वचेचे विकार किंवा पित्त यासारख्या तक्रारींवर यावेळी उपचार करण्यात आले.

No comments:

Post a Comment