'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या मयुर सरोदेची सौरउर्जेवर काम करण्यासाठी सर्चला भेट


मयूर सरोदे
निर्माण 4 चा मयुर सरोदे हा मूळचा नाशिकचा असून तो सध्या नागपूरमध्ये VNIT मध्ये BE Computer Science च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. गेले एक वर्षापासून तो विज्ञान प्रसारभारतीबरोबर ‘उर्जा’ या विषयावर काम करत आहे. निर्माण कॅम्पदरम्यान बरीच वीज वापरली जाते तसेच वायाही जाते याचे त्याने निरीक्षण केले. म्हणून वीजेचा अपव्यय टाळून त्याचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी त्याने नुकतीच सर्चचा भेट दिली. या भेटीदरम्यान त्याने सर्चच्या परिसरात जनरेटरद्वारा आणि वीज महामंडळाद्वारा येणारी एकूण किती वीज वापर जाते याविषयीची माहिती गोळा केली. सर्चची मेस किंवा रस्त्यावरील दिव्यांसाठी सौरउर्जेचा वापर करता येईल का याचाही तो विचार करत आहे. यासाठी आवश्यक असणारी आकडेवारी त्याने गोळा केली आहे. नागपूरला परत जाऊन तो यामागील एकूण येणार्‍या खर्चाचा अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे सौरउर्जा किंवा किफायतशीर असणार्‍या इतर उर्जास्रोतांचा सर्चमध्ये वापर करता येईल का याचा निर्णय घेतला जाईल. पुढे त्याला rural electrification मधेच काम करायची त्याची इच्छा असल्याने सर्चमधील कार्यानुभवाचा त्याला नक्कीच उपयोग होईल. मयुरला पुढील कामासाठी मनापासून शुभेच्छा!

No comments:

Post a Comment