'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या महेश लादेची ‘प्रथम’तर्फे छत्तीसगडला भेट

महेश लादे
निर्माण 4 चा महेश लादे हा गेल्या दोन महिन्यापासून ‘प्रथम’ या शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेशी संलग्नित आहे. त्याने प्रशिक्षणाच्यानिमित्ताने नुकतीच छत्तीसगडला भेट दिली. प्रथमचा POS- Pratham Open School हा नवीन उपक्रम सुरु होत आहे. जि मुले काही कारणामुळे दहावीनंतर पुढे शिकू शकली नाहीत त्यांना अभिनव पध्दतींचा वापर करुन परिक्षेसाठी पुन्हा तयार करायचे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. यात त्या व्यक्तीला पहिले तीन महिने (Foundation Course) इंग्लिश,गणित,भाषा आणि विज्ञान हे विषय शिकवले जातील. या व्यक्ती गेले अनेक वर्ष शाळा, परिक्षा या गोष्टींपासून दूर असल्यामुळे त्यांच्या मनात शिक्षणाविषयी भीती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पाठ्यपुस्तकांपेक्षा वेगळी पध्दत वापरली जाईल. यात अभ्यासक्रमातील विषय त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंध जोडून शिकवल्या जातील. हा उपक्रम महाराष्ट, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये सुरु होईल.या उपक्रमात प्रशिक्षक म्हणून काम करणार्‍या लोकांना इंग्लिश विषयाचे प्रशिक्षण देण्यासाठी महेश आणि त्याच्या गटाने छत्तीसगडमधील राजनांदगांवला भेट दिली. प्रशिक्षणादरम्यान औषधांवरील सूचना कशा वाचाव्यात, दिशाभूल करणार्‍या जाहिराती कशा ओळखाव्यात, रेल्वेचे आरक्षण कसे करावे, स्वत:चा CV कसा तयार करावा अशा व्यवहारात लागणार्‍या गोष्टींमार्फत त्याने इंग्लिशचा परिचय कसा करावा याचे प्रशिक्षण दिले. महेशने एक प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदाच भूमिका निभावली. त्यामुळे त्याच्यासाठी हा एक चांगला अनुभव  राहिला.

No comments:

Post a comment