'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 चा सुजय काकरमठ सर्चमधील फिरत्या दवाखान्यास वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू

निर्माण 4 चा सुजय काकरमठ मुंबईच्या लोकमान्य टिळक सायन वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने नुकतीच आपली इंटर्नशिप पूर्ण केली आहे. या इंटर्नशिप दरम्यान हॉस्पिटलमध्ये प्राथमिक वैद्यकीय सेवांवर (Primary care) विशेष लक्ष दिले जात नाही हे त्याच्या लक्षात आले. आणि यातूनच Primary care मध्ये काम करण्याचा त्याने निर्णय घेतला. जूनपासून सुजय ‘सर्च’मधील फिरत्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला. तसेच पब्लिक हेल्थ हाही त्याचा आवडता विषय असल्यामुळे सर्चमधील संशोधनामध्येही त्याचा सहभाग राहील. निर्माण 2 चा वैभव आगावणे हाही फिरत्या दवाखान्याचा वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असल्याने कामात या दोघांना एकमेकांची चांगली सोबत होईल. सुजयला पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा!

No comments:

Post a Comment