'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

निर्माण 4 च्या हर्षद बोकीलचा आय.आय.टी मुंबईमध्ये प्रवेश


निर्माण 4 च्या हर्षद बोकीलला आय.आय.टी मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्समध्ये M.Tech साठी प्रवेश मिळाला आहे. हर्षदने नागपूरमधील व्ही.एन.आय.टी कॉलेजमधून Electronic and telecommunication मध्ये B.Tech केले असून त्याला पुढे उर्जेच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. हर्षदला त्याच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा!

No comments:

Post a Comment