'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

‘यतिन दिवाकर’ आणि ‘आकाश बडवे’ यांना केंद्रसरकारची ग्रामीण विकास खात्याची शिष्यवृती प्रदान

भारत सरकारच्या ग्रामीण विकास खात्याने ‘Prime ministers rural development fellowship scheme’ जाहीर केली आहे. दोन वर्षासाठी दिल्या जाणार्‍या या शिष्यवृत्तीअंतर्गत भारतातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कलेक्टरला विकासकामात सहकार्य करण्यासाठी भारतातून काही तरुणांची निवड केली जाणार आहे. याची प्रथम फेरी नुकतीच पार पडली असून संपूर्ण भारतातून आलेल्या एकूण 8100 तरुणांमधून 780 मुलांची दुसर्‍या निवड फेरीसाठी करण्यात आली. दुसर्‍या फेरीतून एकूण 225 तरुण निवडले गेले असून यात निर्माणच्या यतिन दिवाकर आणि आकाश बडवे यांचा समावेश आहे. यतिन सध्या आय.आय.टी मुंबई येथून rural development and technology यात पदव्यूत्तर शिक्षण घेत आहे. यतिनला शाश्वत जीवनशैलीचा अभ्यास करण्यात व ग्रामीण भागातील विकासात्मक कामांत विशेष रुची आहे. सध्या तो बायोगॅस तंत्रज्ञान विकसित करण्याकरता काम करत आहे. या आधी त्याने बायफ या संस्थेबरोबरही काम केले आहे. आकाश इलेक्ट्रोनिक्स इंजिनीयर असून तो पुण्यात एका कंपनीत नोकरी करतो. या दोघांच्या कामाचे ठिकाण अजून निश्वित झालेले नसून मेपासून सुरु होणार्‍या प्रशिक्षणादरम्यान त्याविषयीची अधिक माहिती मिळेल. यतिन आणि आकाशच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल निर्माण परिवारतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा ! 
यतीन दिवाकर
आकाश बडवे

No comments:

Post a Comment