'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

‘निर्माण’चा तारुण्यात प्रवेश


निर्माण सुरु होऊन आता सहा वर्षे पूर्ण झालीत. निर्माणच्या चौथ्या बॅचचे शेवटचे शिबिर नुकतेच शोधग्राममध्ये संपन्न झाले. गेल्या सहा वर्षात निर्माणची नियमित 17 शिबिरे व विशेष विषयांवर 4 शिबिरे अशी एकूण 21 शिबिरे झालीत ज्यात आतापर्यंत जवळपास 350 युवांनी (निर्माणी) भाग घेतला.

निर्माण आता ख-या अर्थाने तारुण्यात प्रवेश करते आहे कारण निर्माण संयोजनाच्या जबाबदारीची पुनर्रचना करून यापुढे ती निर्माण शिक्षणप्रक्रियेमधून निघालेल्या युवांनीच सांभाळावी असा प्रयत्न राहील. तसे होणे हे तरुण होणे व जबाबदारी घेणे याचे चिन्ह असेल.

यानुसार निर्माण संयोजनाची जबाबदारी आता नव्या युवा टीमने स्वीकारली आहे. ती टीम आहे - अमृत बंग, सायली तामणे, संदीप ढोले, संदीप देवरे, मुक्ता नावरेकर, आनंद बुडईकर, त्रिशूल कुलकर्णी, चारुता गोखले, निखिल जोशी, अतुल गायकवाड, अश्विन भोंडवे, वैभव आगवणे, क्रांती डोईबळे, रंजन पांढरे, भाग्यश्री अग्निहोत्री, विक्रम सहाने. यापैकी अमृत व सायली हे संयोजनाची केंद्रीय जबाबदारी पूर्ण वेळ सांभाळतील व इतर सर्वजण आपापल्या गावाहून त्या त्या भागातील जबाबदारी सांभाळतील तसेच विविध उपक्रमात मदत करतील.
या शिवाय अमिताभ व वेंकी हे दोघे सल्लागार म्हणून त्यांना वेळोवेळी मदत करतील.

निर्माणच्या वाढत्या कक्षा व जबाबदा-या सांभाळून ‘अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध’ घेण्यामध्ये पुढे वाटचालीसाठी या नव्या निर्माण संयोजन टीमला आपण सर्व शुभेच्छा व सहयोग देऊ या!
      अभय व राणी बंग                                       विवेक सावंत

2 comments:

 1. नमस्कार,
  “निर्माणचा तारुण्यात प्रवेश” व “उमेश भाउंना निरोप” हे लेख वाचुन अतिशय आश्चर्य वाटले. गेलि अनेक वर्ष निर्माणची जवाबदारी सक्षमपणे पार पाडणार्‍या, निर्माणकरता झटणार्‍या, निर्माणच्या विविध उपक्रमात अतिशय उत्साहीपणे सहभागी होणार्‍या, अनेक रिजनल कॅंपचे सुंदर नियोजन करणार्‍या उमेश भाउंना असे कोणत्याही कारणाशिवाय तडकाफडकी काढले याचे अतिशय वाईट वाटले.

  निर्माण सुरु होउन 6 वर्ष झाली, एकुण 21 शिबिरे झाली, एवढ्या कालावधीनंतर निर्माणींनी तरुण होणे, जवाबदार होणे हे म्हणणे हास्यास्पद आहे.
  तसेच निर्माण संयोजन हे नविन टिम करणार आहे तर जुन्या लोकांना का काढायचे ? व जवाबदारी निर्माण शिक्षणप्रक्रियेतुन निघालेल्या युवकांनीच सांभाळायची असेल तर... सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य आहे का? हिच टिम का ? हि टिम कोणी निवडली ? असेच लोक टिम मधे घ्यायचे का,...
  की जे काही वाईट घडले तर डोळे उघडुन पाहणार नाहीत, काही निंदनिय घडले तर त्यावर काही बोलणार नाहीत, फक्त ऐकुन घेतिल आणी सोडुन देतिल...

  फक्त नावालाच लोकशाही का ? एखादा निर्णय संयोजन समितीला मान्य नसेल तरी तो राबवला जाणार का?, कामे करायची पण बोलण्याचा अधिकार नाही, हमारा करें सो कायदा ... या पध्दतिनेच चालणार का?, लोकसहभाग असणारच नाही का?, जर उत्तर हो असेल तर बोलणेच संपले...

  पण उत्तर नाही असेल तर उमेश भाउंना काढले हे संयोजन समिती मधील सर्वांना मान्य आहे का ?
  मला हे पुर्ण मान्य आहे की 350 जणांचे विचार घेउ शकत नाही, परंतु संयोजन समितीमधील प्रत्येकाने तरी यावर प्रतिक्रिया द्यावी व निदान यावेळी तरी पारदर्शकतेचा आग्रह धरावा ... (ईतर वेळी नेहमिप्रमाणे गुप्तता आहेच)
  प्रतिक्रिया न दिल्याने आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना असे वाटते कि घडलेल्या गोष्टीला कोणाचाच विरोध नाही...
  प्रश्न विचारावे, आपल्या मनाला न पटणार्‍या गोष्टींना विरोध करावा, स्वतःची काही मते, काही विचार काही तत्वे असावित, हे मि निर्माण मधुनच शिकलो. व प्रत्येकाने निदान एवढे तरी संवेदनाक्षम व्हावे असे मला वाटते.
  व्यक्तिशः माझा कोणावरही आरोप नाही, तसे कोणाला वाटल्यास मि दिलगिरी व्यक्त करतो... व या घडलेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आहे.
  धन्यवाद,

  - सिध्दार्थ

  ReplyDelete
  Replies
  1. संयोजन समिती मधील प्रत्येकाने प्रतिक्रिया देणे ही त्यांची नैतिक जवाबदारी आहे असे मि मानतो. सर्वांच्या वतोने कोणी एकाने प्रतिक्रिया देउ नये कारण सर्वांची मते भिन्न असतात. तसेच संयोजन समिती वगळता ईतरांनी प्रतिक्रिया द्यायला काहिच हरकत नाही. (हरकत घेणारा मी कोण ???)
   -सिध्दार्थ

   Delete