'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माणच्या मलेरिया निर्मूलनाच्या उपक्रमात भंडाऱ्यातील शालेय मुलांचा सहभाग


निर्माण 4 ची मूळची नागपूरची असलेली वृंदन बावनकर सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी या गावातील एका शाळेत शिकवत आहे. निर्माणच्या मच्छरदाण्यांसाठी निधी उभारण्याच्या उपक्रमाविषयी या शालेय मुलांना वृंदनकडून कळले आणि त्यांनीही यात मदत करण्याचे ठरवले. केवळ 10 दिवसात पहिली ते नववीच्या 60 मुलांनी 1500 रुपयांची रक्कम गोळा केली. यासाठी आई- वडिलांकडे वेगले पैसे न मागता वाढदिवसासाठी राखून ठेवलेल्या पैशाचा त्यांनी उपयोग केला. मुलांचे हे काम उल्लेखनीय आहे. मुलांचे आणि त्यांना प्रोत्साहित करणार्‍या वृंदनचे मन:पूर्वक धन्यवाद! 


No comments:

Post a comment