'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माणींची छत्तीसगड मधील जन स्वास्थ सहयोग संस्थेला भेट


सचिन बारब्दे
निर्माणचे 3 डॉक्टर्स सचिन बारब्दे, विठ्ठल साळवे व विक्रम सहाने गेले एक वर्ष गडचिरोलीतील पेंढरी, कारवाफा व गट्टा या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. हे तीन जणं, विठ्ठलची पत्नी डॉ. प्रणाली व अमृत बंग अशा पाच जणांनी नुकतीच बिलासपूर येथील ‘जन स्वास्थ सहयोग’ या आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेला भेट दिली. डॉ. योगेश जैन, डॉ. रमण आणि डॉ. भार्गव या AIIMS दिल्ली येथील डॉक्टरांनी मिळून बिलासपूरहून 25 किमी अंतरावर असलेल्या गणयारी या गावात 1999 मध्ये कम्युनिटी सेंटर सुरु केले. या तिघांनीही Medico friend circle या चळवळीपासून प्रेरणा घेऊन comprehensive rural health care प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. या सेंटरद्वारे त्यांनी एकूण 104 आरोग्यसेवक प्रशिक्षित केले असून 53 गावांमध्ये आज आरोग्यसुविधा पुरवल्या जातात. सुमारे 5000 लोकसंख्या असलेल्या गणयारी गावात आज त्यांचे 35 बेडचे हॉस्पिटल असून त्यात वर्षात सुमारे 1400 शस्त्रक्रिया होतात, तर आठवड्यातून 3 दिवस चालणा-या OPD मध्ये दर दिवशी अंदाजे 225 रुग्णांची गर्दी असते. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा गरजा व त्यांना मिळणा-या सुविधा यातील प्रचंड असमानतेवर काम करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. डॉ. योगेश जैन यांनी निर्माणबद्दल विस्तृत जाणून घेतले व पुढेही निर्माणींनी तेथे भेट देण्यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण दिले. पेंढरीतील 1 वर्षाची एम.ओ.शिप येत्या महिन्यात संपत आलेल्या डॉ. सचिन बारब्देला पुढे ग्रामीण भागात आरोग्याचे काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक अनुभव व कौशल्य मिळण्यासाठी त्याने पुढील 1 वर्ष जन स्वास्थ सहयोग सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगितले असता डॉ. योगेश जैन यांनी अत्यानंदाने त्याचे स्वागत केले. 15 एप्रिलपासून सचिन गणयारी येथे काम सुरु करेल. काम करताना वैद्यकीय सेवा, संशोधन, सामाजिक आरोग्य, प्रशिक्षण, गावपातळीवरील आरोग्यशिक्षण अशा विविध क्षेत्रातील अनुभव मिळेल. सचिनला या नव्या प्रवासासाठी निर्माण परिवारातर्फे खूप शुभेच्छा ! 
   

No comments:

Post a comment