'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

रंजन पांढरे व अजय होले यांचे कठाणी नदीचे सर्वेक्षण सुरु

गोदावरी नदी व त्यावर अवलंबून लोकजीवन, जैवविविधता, शेती, मासेमारी यांचा भ्यास करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रकल्प ‘गोमुख’ संस्थेचे श्री. विजय परांजपे यांनी हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून गोदावरी नदीच्या उपनद्या असणार्‍या  वैनगंगा आणि काठाणी नदीचा सर्व्हे करायचा आहे. या सर्व्हेमध्ये निर्माण 4 चा अजय होले, रंजन पांढरे सहभागी आहेत. निर्माण 4 च्या शिबिरादरम्यान श्री. मनिष राजनकरांनी या उपक्रमाचा उल्लेख केला होता. या दोघांनी लगेच संपर्क साधून यावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कठाणी नदीच्या खोर्‍यात एकूण 250 गावे आहेत. रॅंडम सॅंमप्लिंग करुन त्यांनी एकूण 10 गावे सर्वेक्षणासाठी निश्चित केली. सर्वेक्षणादरम्यान एका प्रश्नावलीच्या आधारे त्यांनी या गावातील लोकांचा जलसिंचनाचा स्रोत काय आहे, गावात एकूण किती विहिरी आहेत, सरकारच्या याविषयीच्या कोणकोणत्या योजनांची त्यांना माहिती आहे, पाणलोट क्षेत्राचा विकास झाला आहे का ही माहिती जमा केली आहे. या माहितीवरुन आत्तापर्यंत कोणतेही निष्कर्ष काढले गेलेले नसून पुढील दोन महिन्यात हा उपक्रम अंतिम टप्प्यात असेल असा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment