'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

डॉ. चेतन लोखंडेचा एम.डी सायकॅट्रीसाठी प्रवेश

निर्माण 3 च्या चेतन लोखंडे याने मुंबई – नायर कॉलेजमधून एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण केले आहे. काही महिन्यापूर्वी त्याने पुढील शिकण्यासाठी महाराष्ट्र राज्याची परिक्षा दिली होती. यात त्याला उत्तम यश मिळाले असून नायर कॉलेजमध्ये त्याला आपल्या आवडीनुसार सायकॅट्रीसाठी प्रवेश मिळाला आहे. निर्माण 3 चा वैभव पाटील सध्या AIMS मध्ये सायकॅट्रीचा अभ्यास करत आहे. यापाठोपाठ चेतनही या शाखेत दाखल झाल्याने येत्या काही वर्षात निर्माणमध्ये दोन मानसोपचार तज्ञ प्रशिक्षित झालेले असतील. चेतनचे निर्माण परिवारातर्फे अभिनंदन!

No comments:

Post a comment