'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण प्रसारासाठी निर्माणच्या समन्वयन टीमचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरे


येत्या डिसेंबरमध्ये सुरु होणा-या निर्माण 5 साठी महाराष्ट्राच्या विविध भागातून युवा यावेत यासाठी निर्माणची माहिती त्या त्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे. म्हणून विविध कॉलेजेस मध्ये निर्माणबद्दल माहिती देणे आणि स्थानिक मिडियाशी देखील संपर्क साधणे महत्त्वाचे ठरते. याच अनुषंगाने जळगाव, धुळे व नाशिक असा एक छोटा दौरा निर्माण टीमच्या वतीने अमृत बंगने केला. जळगाव शहरातील व धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील विविध कॉलेजेसमध्ये या निमित्ताने निर्माण पोहोचलं. त्या भागात चांगले सामाजिक काम करणा-या लोकांना व संस्थांना भेटणे आणि निर्माण समुदायाशी जोडून घेणे हा देखील एक उद्देश्य होता. त्यानुसार एरंडोल येथील डॉ. संग्राम व नुपुर पाटील, बहादरपूर येथील निलिमा मिश्रा, जळगावातील शेखर सोनाळकर, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे योगेंद्र यादव, शिरपूर येथील रविंद्र रुक्मिणी पंरीनाथ व अनुराधा मोहनी, इ. लोकांसोबत भेट व चर्चा झाली. या सर्वांनी निर्माणच्या कल्पनेचे स्वागत केले व जोडून घेण्यास अनुकूलता दर्शविली. तसेच खानदेशमधील प्रमुख वर्तमानपत्रांच्या निवासी संपादकांशी चर्चा होऊन त्यांनीही निर्माणच्या प्रसाराबद्दल मदत करण्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान निर्माण 3 च्या मुक्ता नावरेकर हिने अमृत आणि अमिताभ खरे या दोघांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली. ती लवकरच आकाशवाणीवर आपण ऐकू शकू. या पूर्ण दौ-याचे आयोजन खानदेशातील निर्माणी संदीप देवरे, अद्वैत दंडवते, सुशील जोशी, हिमांशु डोंगरे, ज्ञानेश मगर यांनी मिळून केले. अमिताभ खरे व सायली तामणे यांनी सोलापूर, लातूर, अंबेजोगाई येथील आपल्या भेटींदरम्यान विविध इंजिनियरिंग व मेडिकल कॉलेजेसमध्ये सादरीकरण केले. त्यात सोलापूरचे वालचंद कॉलेज, भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज, ऑर्किड कॉलेज, लातूरचे शाहू, दयानंद, बिडवे, बसवेश्वर व मेडिकल कॉलेज व आंबेजोगाईचे मेडिकल कॉलेज यांचा समावेश होता. तसेच उमेश खाडे व सायली तामणे यांनी मिळून सांगली, मिरजचे वालचंद कॉलेज, मेडिकल कॉलेज, इचलकरंजीचे शरद कॉलेज व डी.के.टी कॉलेजच्या मुलांशी चर्चा केली. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक गटांशी देखील या निमित्ताने संवाद साधता आला.   

No comments:

Post a comment