'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

प्रियदर्श तुरे च्या मार्गदर्शनाखाली मेळघाटात साकारला लोकसहभागाचा एक आदर्श नमुना


निर्माण  2 चा डॉ. प्रियदर्श तुरे (सोनू) गेली 2 वर्ष मेळघाटातील काटकुम्भ येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. काटकुम्भ मध्ये विविध रचनात्मक कार्यक्रम करण्यात त्याचा नेहमीच सहभाग असतो. एप्रिल महिन्यात तेथे आधीपासून कार्यरत असलेल्या तरुण मुला-मुलींच्या गटाला एकत्रित करून सोनूने जनावरांसाठी  पिण्याच्या पाण्याची टाकी व महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्याची योजना आकारात आणली. रामनवमीच्या उत्सवासाठी जमलेल्या पैशाचा थोडा भाग या कामांसाठी राखून ठेवला गेला. काही पैसे गोळा केले गेले तर उरलेले पैसे लोकांनी आपल्या खिशातून घातले. या दोन्ही योजना साकार करण्यात सोनुचा मोलाचा सहभाग होता. विशेष उल्लेखनीय बाब अशी की महिलांच्या शौचालयाचे सर्व खोदकाम, सेप्टिक टॅंकची स्वच्छता, electric connections, plastering, coloring हे सर्व तेथील महिलांनी केले. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या दोन्ही बांधकामांचा लोकार्पण सोहळा झाला. प्रियदर्शचे काम असेच उत्तरोत्तर वाढो या त्याला शुभेच्छा!       
अधिक माहितीसाठी 

 http://www.ehitavada.com/news.detail/paper_type/4/news_id/116668/date/2012-04-20   
http://www.ehitavada.com/news.detail/paper_type/4/news_id/116674/date/2012-04-20

No comments:

Post a Comment