'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणाबाबतच्या बैठकीत आनंद टेके आणि सायली तामणे यांची उपस्थिती

आनंद टेके
उजनी धरणाचे पाणी अत्यंत प्रदुषित झाले असून तेथील लोकांना विविध आरोग्याचे आजार जडत आहेत. तसेच शेती व मासेमारीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या विषयाला वाचा फोडण्यासाठी एक बैठक पळसदेव (तालुका इंदापूर) येथे आयोजित केली होती. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेले विविध गटांचे प्रतिनिधी – शेतकरी संघटना, मासेमारी युनियन, आसपासच्या खेड्यांतील गावकरी यासाठी एकत्र आले होते. निर्माण 1 चा आनंद टेके व सायली तामणे हे सुद्धा या बैठकीला हजर होते. आनंद टेके याने नुकतेच नेदरलँड्स मध्ये अपारंपारिक उर्जेच्या विषयावर मास्टर्स पूर्ण केले असून तो भारतात परत आला आहे. त्याच्या प्रोजेक्टचा विषय सौर उर्जा वापरून पाण्याचे शुद्धीकरण असल्यामुळे बैठकीदरम्यानचे त्याचे योगदान महत्त्वाचे ठरले.

No comments:

Post a comment