'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

कल्याणी कटारिया व प्रवीण प्रयाग यांची विज्ञान प्रचारासाठी नागालँडला भेट


प्रवीण प्रयाग व कल्याणी कटारिया हे आपल्या निर्माण परिवाराचेच सदस्य. प्रवीण व कल्याणी हे दोघेही इंजिनियर असून सध्या नोकरी करीत आहेत. मात्र विज्ञानाची दोघांनाही खूप आवड आहे. कल्याणी नियमितपणे पुण्यातील काही वस्तीतल्या शाळांमध्ये विज्ञानाचे प्रयोग करीत असते. पुणे विद्यापीठातील आयुकामधील श्री. अरविंद गुप्तांबरोबर सुद्धा तिने काम केले आहे. प्रवीण भारतातील ईशान्य भागातील राज्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी ‘युरेका’ नावाचे मासिक गेले अनेक वर्ष स्वखर्चाने काढत असून तेथील सात राज्यांमधील १५० शाळांमध्ये हे मासिक विनामूल्य पोचवण्याचे काम सातत्याने करत आहे.   
   
गेल्या महिन्यात नागालँड येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने, मुलांना वर्गात अवघड आणि कंटाळवाण्या वाटणाऱ्या विज्ञानाच्या संकल्पना खेळण्यांच्या, प्रयोगाच्या माध्यमातून पोचवण्यासाठी एका शिबिराचे आयोजन केले गेले होते. एका गटाने पेरेन भागात दिमापुर, ओल्ड तेसन, तेनिंग आणि जालुकी शा ४ ठिकाणी शिबीर घेतली. चारही गावांमध्ये मुलांचा प्रतिसाद खूप छान होता. प्रत्येक शिबिरात साधारण १०० विद्यार्थी होते. तर दुसऱ्या गटाने विस्वेमा, तेसोफेन्यू आणि मोकोकचुंग या गावांमध्ये शिबिर घेतली. कॅथलिक, Baptist सरकारी अशा तीन शा तीन शाळातील साधारण ४० मुले शिबिरात आली. सुरुवातीला खूप लाजरी बुजरी असलेली मुलं एकदा प्रयोगातली गम्मत कळली की छान खुलत होती. Centrifugal Force समजावून घेताना घातलेल्या फुगड्या तर त्यांना मनापासून आवडल्या. यापूर्वी कुठल्याही बाहेरच्या माणसांनी त्या गावांमध्ये प्रवेश केला नव्हता. नागालॅडला मुख्य प्रवाहात आणण्याचा हा छोटासा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. या दोघांचे निर्माण परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

No comments:

Post a comment