'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

निर्माणच्या चंद्रपूर गटाचे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम


जंगम वस्तीमधील सभेत निखिल जीवने
निर्माण चंद्रपूरच्या निखील जीवने ,प्रेरणा  राउत, माधुरी गायकवाड , शरद अष्टेकर, प्रांजू , अंजू  , वृषाली  , शुभांगी  यांनी मिळून चंद्रपूर मधील जंगम  वस्ती  या  दुर्गम  वस्तीत काम करण्याचे ठरवले. तेथील  लोकांसाठी  काम करायचे तर त्यांच्या  दृष्टीकोनातून  त्यांची  काय समस्या  आहेहे  जाणून  घेण्याच्या उद्देशाने वस्तीमध्ये एक सभा घेण्यात आली. त्यातून आरोग्य व शिक्षण या दोन समस्या प्रामुख्याने समोर आल्या. शिक्षणावर काम करताना जागेची अडचण समोर आली. तेथील अंगणवाडी सेविकेने पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून दिली. ‘संडे स्कूल’ असे या शाळेचे नाव ठेवण्यात आले. संडे स्कूल मध्ये कधीही  शाळेत न गेलेली , शाळेत  जात  असूनही  त्यांना  बाराखडी  येत नसलेली सुमारे  1520  मुले  जमतात. त्यांचे पाडून वेगवेगळे लेखन वाचनाचे उपक्रम आयोजित केले जातात. शिक्षण कंटाळवाणे न होते त्यात सतत नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच मुलांना जुगार, दारू, चोरी अश्या वाईट सवयींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सतत सुरु असतो. शिक्षण  शी  समस्या  होती  तशी  महिलांच्या  आरोग्याचाही  प्रश्न  सोबत  होताच. त्याकरीता किशोरवयीन  मुलींसाठी  "वयात  येताना"  या  शिबिराचे  आयोजन करून त्यांना आरोग्याबद्दल   माहिती  दिली गेली. यासोबतच जुने कपडे जमा करून ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील उपक्रम सुरु आहे. या  कामात   विकलांग  सेवा  संस्था  चंद्रपूर  यांचाही  फार मोलाचा  वाटा  आहे.

No comments:

Post a comment