'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

संतोष गवळेच्या प्रयत्नांनी लोकवर्गणी व श्रमदानातून मन्याळी गावाच्या पाणीप्रश्नावर तोडगा

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांप्रमाणे मन्याळी हे पाणी टंचाईगस्त गावं. टंचाईग्रस्त गाव म्हणून शासन या गावाला विहीर अधिग्रहणासाठी दरवर्षी चाळीस ते पन्नास हजार रूपये पुरवत असे. पण या वर्षी मात्र गावकर्‍यांनी एकत्र येऊन पाणीसमस्या निवारण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी निर्माण 2 च्या   संतोष गवळे  यांच्या पुढाकाराने गावकर्‍यांनी गावालगत श्रमदानाव्दारे विहीर खोदली. विहीरीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. पण नळ जोडणीसाठी कोणत्याच योजनेअंतर्गत शासनाकडून गावकर्‍यांना मदत मिळाली नाही. गावकर्‍यांनी मात्र हार न मानता नळ योजना लोकवर्ग़णीतून करण्याचा निर्णय घेतला. आणि दोन दिवसात चाळीस हजार लोकवर्गणी जमा केली विहीरीवरून मोटारपंपाव्दारे पाणी गावात आणलं. चौका-चौकात पाईपास तोट्या बसवून प्रत्येक घरी पाणी पुरवण्यात आलं. कमीतकमी खर्चात नळ योजना सुरु झाली. लोकांचे पाण्यासाठीचे श्रम वाचले.   मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या बांधकामास गती मिळाली आहे. आज प्रत्येक कुटूंबास दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा होत असून गावातील पाणी समस्या कायमची सुटली आहे.

No comments:

Post a Comment