'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माणच्या गटाची भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शाळेला अभ्यासभेट

निर्माण 4 ची वृंदन बावनकर गेली दोन वर्ष भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात आपल्या स्वत:च्या शाळेत शिकवत आहे. ही शाळा पूर्णत: खाजगी असून नर्सरी ते नववीपर्यंत एकूण 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिकवण्याबरोबरच ती या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनही सांभाळते. या शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त संगीत, खेळ, चित्रकला, नाटक हे विषय शिकवण्यासाठी निर्माण 1 च्या चारुता गोखले, सायली तामणे, राजू भडके, निर्माण 3 च्या अश्विन भोंडवे, अतुल गायकवाड आणि निर्माण 4 च्या निखिल जोशी यांनी दोन दोन दिवस पवनीच्या शाळेला भेट दिली. नंदा खरे यांनीही मुलांबरोबर शेतीचे काही प्रयोग घेतले. चारुताने मुलांना गाणं शिकवण्याची जबाबदारी घेतली. अश्विनने विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खेळ शिकवले. अतूलने मुलांना चित्रकला आणि ओरिगामीचे हसतखेळत धडे दिले. सायलीचा नाटकाचा तासही मुलांना खूप आवडला. शिकवण्याबरोबरच शिक्षकांशी संवाद साधण्याची त्यांना संधी मिळाली. शाळेच्या व्यवस्थापनात आणि एकूणच शिक्षणाच्या पध्दतीत बदल करण्याचे वृंदनने ठरवले आहे. सायली आणि राजूला शिकवण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांनी शिक्षकांबरोबर केलेली चर्चा अत्यंत उपयोगी ठरली. गरज असेल त्यावेळी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था ‘ग्राममंगल’ येथे करण्याविषयीही यावेळी चर्चा झाली. वृंदनची दोन वर्षापूर्वी नेव्हीमध्ये निवड झाली होती. परंतु घरच्या शाळेचा अधिक विकास करण्याचे आव्हान स्विकारुन ती सध्या शिक्षिका आणि व्यवस्थापकीय प्रमुख अशा दुहेरी भूमिका अत्यंत चोख बजावत आहे. वृंदनचे निर्माण परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

No comments:

Post a comment