'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

सजल कुलकर्णी व प्रीती बंगाळ ह्यांनी घेतला गरवारे कॉलेज मध्ये बायोडायव्हर्सिटीवरील चर्चासत्र आयोजित करण्यात सहभाग


प्रीती बंगाळ
गरवारे महाविद्यालयात जैवविविधतेवर नुकतेच एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात निर्माण 2 च्या सजल कुलकर्णी व निर्माण 4 च्या प्रीती बंगाळ यांचा मोलाचा सहभाग होता. जैवविविधतेचे महत्व व त्याची जपणूक करण्याची तातडीची गरज लोकांपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश होता. या प्रसंगी डॉ. कस्तुरीरंगन, डॉ. वसंत गोवारीकर इत्यादींनी त्यांचा दृष्टिकोन मांडला. तसेच प्रवीणसिंग परदेशी ह्यांनी जैवविविधता व त्यावर आधारित उद्योग व रोजगार ह्यावर भाष्य केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात, निर्माण परिवाराचाच भाग असलेल्या संजय पाटील यांनीही  जतन केलेल्या तांदळाच्या, ज्वारीच्या पारंपारिक जाती, तसेच औषधी वनस्पती ह्यांचे प्रदर्शन केले. त्याच बरोबर देशातल्या विविध कोपऱ्यातून आलेल्या लोकांनी पोस्टर्सची मांडणी केली. जनावरे, शेती, झाडे, फुलपाखरे इत्यादींच्या विविधतेबद्दल अनेक फोटोंचे देखील त्यात प्रदर्शन मांडले होते. 

No comments:

Post a Comment