सध्या भारतामध्ये
जवळपास 4 कोटी मुलं शाळेच्या बाहेर आहेत, असा अभ्यास सर्चमध्ये काम करणारे निर्माण 3 चे अश्विन भोंडवे, अतुल गायकवाड आणि निखिल जोशी यांच्या मध्यंतरी वाचनात आला. यातून
‘गडचिरोली भागात शाळेत न जाणार्या प्रमाण किती? त्याची कारणं कोणती?’ याचा अभ्यास करावा ही कल्पना पुढे आली. पायलट उपक्रम म्हणून त्यांनी प्रथम गडचिरोली
मधील मेंढा (लोकसंख्या-1200) या गैरआदिवासी गावात मुलांच्या शाळा गळतीसंबंधी अभ्यास केला. पाच दिवसांच्या या
अभ्यासामध्ये या तिघांनी 5-20 वयोगटातील 260 मुलांचे सर्वेक्षण केले. यात मुली आणि मुलांचे प्रमाण समान होते. या अभ्यासातील
निष्कर्ष खालीलप्रमाणे
- 31% मुलांनी शाळा सोडली आहे. यामध्ये मुला-मुलींची
संख्या जवळपास सारखीच आहे
- मुलं साधारणतः 6वी-10वी या इयत्तांदरम्यान अधिक प्रमाणात शाळा सोडतात
- शिक्षणात रस नसणे आणि नापास होणे या कारणांमुळे
शाळा सोडण्याचे प्रमाण 50% पेक्षा अधिक आहे
- शाळा सोडणारे 45% मुलं सध्या मजूरी करतात
- निरक्षर पालकांच्या मुलांपेक्षा साक्षर पालकांच्या
मुलांमध्ये शाळेत जाण्याचे प्रमाण दुप्पट आहे
या अभ्यासातून एका गावातील शाळेत न जाणार्या मुलांचे प्रमाण, शाळेत न जाण्याची कारणे आदी बाबी पुढे आल्या. ‘राइट टू एज्युकेशन’ अंतर्गत मुलांना शाळा दूर पडू नये यासाठी अजून शाळा बांधण्याचा शासन विचार
करत आहे. पण, त्यासोबतच सुविधा उपलब्ध असुनही शाळा गळतीची कारणे कोणती? ती
सोडवण्यासाठी काय करायला हवं? याकडे लक्ष द्यायला हवं हाही मुद्दा यातून पुढे येतो.
 |
अश्विन, अतुल व निखिल |
No comments:
Post a Comment