'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माणच्या मुलांची सायन हॉस्पिटलमधील लेबर रूमसाठी गाद्या आणण्यात आर्थिक मदत


डॉ. तरू जिंदाल ही आपल्या निर्माण परिवाराची एक सदस्य. ती सध्या सायन हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे. तेथील लेबर रूम मधील बेड्स वर गाद्या (mattress ) नाहीत. आणि लेबर रूम एअर कंडीशन्ड असल्यामुळे ते बेड्स खूप थंड पडतात. आधीच अत्यंत वेदनेत असलेल्या गर्भवती महिलांना ह्यामुळे दुहेरी त्रास होतो. गाद्यांसाठी हॉस्पिटल प्रयत्न करीत असले तरी सरकारी काम असल्यामुळे ते खूप   रखडले होते. तरु ने ह्यावर काम करण्याचा निश्चय करून तिच्या ओळखीच्या लोकांना ह्यासाठी मदत मागितली. एका महिन्याच्या आत ३३००० रुपये जमले. ह्यामध्ये निर्माणींचा मोलाचा सहभाग होता. त्या पैशातून लेबर रुमच्या ९ बेड्स वर गाद्या टाकण्यात आल्या आहेत. लोकांचा इतका भरगोस प्रतिसाद होता कि तरू ला पैसे पाठवू नका असे शेवटी म्हणावे लागले. सरकार जे काम ४ वर्षात करू शकलं नाही ते एका महिन्यात झाले. तरुच्या ह्या पुढाकाराबद्दल निर्माण परिवारातर्फे तिचे अभिनंदन. 

No comments:

Post a comment