'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 29 August 2012

निर्माण 2 च्या सजल कुलकर्णीचे स्पार्क फेलोशिपद्वारा ‘बायफ’ संस्थेबरोबर काम सुरु


निर्माण 2 च्या सजल कुलकर्णीने Bio- diversity या विषयात नुकतेच Masters पूर्ण केले असून पुढील एक वर्ष तो ‘बायफ’ या संस्थेत काम करणार आहे. त्याला या संस्थेची ‘स्पार्क फेलोशिप’ प्राप्त झाली असून पूर्व विदर्भातील गायींच्या जातीवर तो या दरम्यान काम करणार आहे. विदर्भातील गोंड व गवळी हे आदिवासी या भागातील स्थानिक गायीच्या जातीचा कशाप्रकारे उपयोग करतात, त्यांची या प्रदेशाशी अनुकूल वैशिष्ट्ये काय, वर्षानुवर्षे या जातीचा लोकांच्या समाजजीवनावर काय परिणाम झाला याचा Anthropology च्या अंगाने तो अभ्यास करणार आहे. तसेच गडचिरोलीतील गोंड आदिवासींची जनावरं आणि तेथे घेतली जाणारी पिकं हाही त्याच्या अभ्यासाचा विषय राहणार आहे. सजलला या नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छा!  

No comments:

Post a Comment