'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 29 August 2012

निर्माण 4 च्या डॉ. बाबासाहेब देशमुखच्या मार्गदर्शनाखाली 13 गावांचे आरोग्यशिबिर आयोजित


निर्माण 4 चा डॉ. बाबासाहेब देशमुख मागील काही महिन्यांपासून सोलापूरमधील परिते या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नांनी 20 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत त्याच्या केंद्राअंतर्गत येणार्‍या 13 गावांमध्ये मोफत रक्तातील लोह तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.15   ते 50 या वयोगटातील एकूण 5238 स्त्रियांनी या शिबिराचा लाभ घेतला. या दरम्यान अत्यंत तीव्र अस्वरुपाचा ऑनिमिया असलेल्या 49 स्त्रियांना पुढील एक महिना औषधाचे दोन डोस तसेच मध्यम स्वरुपाचा ऑनिमिया असणार्‍या स्त्रियांनाही मोफत उपचार देण्याची सोय करण्यात आली होती. आरोग्य केंद्रातील तीन डॉक्टर्स आणि आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने ही तपासणी करण्यात आली. येवढ्या मोठया प्रमाणात लोहतपासणीचे शिबिर सोलापूर जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आले.

याच टीमने 12 ऑगस्टला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळील पेट्रोल पंपावरील एकूण 83 ट्रक ड्रायव्हरचे आरोग्य तपासणी आयोजित केली होती. यादरम्यान त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली व तोंडाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सत्रं आयोजित करण्यात आली होती. दवाखान्यात बसून रुग्ण तपासण्याच्या पलीकडे लोकांपर्यंत जाऊन खर्‍या अर्थाने DOC (Doctor of Community) होण्याचा बाबासाहेब आणि त्याच्या टीमचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे

 

No comments:

Post a comment