'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 29 August 2012

केंद्रसरकारच्या ग्रामीण विकास खात्याच्या शिष्यवृतीअंतर्गत यतिन दिवाकर आणि आकाश बडवे यांचे काम सुरु


भारतातील नक्षलग्रस्त राज्यांमध्ये विकासाच्या कामात प्रशासनाला मदत करण्यासाठी  केंद्रसरकारच्या ग्रामीण विकास खात्यातर्फे Prime ministers rural development fellowship scheme’ जाहीर करण्यात आली होती. यात निर्माण 2 चा यतिन दिवाकर आणि निर्माण 4 चा आकाश बडवे यांची निवड झाली असून पुढील दोन वर्ष हे दोघेही छत्तीसगडमध्ये जिल्ह्याधिकार्‍याबरोबर काम करतील. यतिनला छत्तीसगडमध्ये ‘नारायणपूर’ तर आकाशला ‘दंतेवाडा’ कार्यक्षेत्र म्हणून मिळाले आहे. यतिनने आय.आय.टी मुंबई येथून technology and development यात पदव्यूत्तर शिक्षण घेतले असून आकाश इलेक्ट्रोनिक्स इंजिनीयर आहे. या दोघांचेही निर्माण परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!  

No comments:

Post a comment