'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 29 August 2012

जळगावमध्ये निर्माण गटाच्या मदतीने पोलीस प्रशासनातील तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित


पोलीस प्रशासनात पदार्पण करणार्‍या युवांना पोलीस प्रशासनातील जाण व सामाजिक भान या गोष्टींची आवश्यकता आहे. यादरम्यान अनेक शंका व प्रश्न युवांच्या मनात असतात. यांना समजून घेऊन आत्मविश्वासाने यंत्रणेत प्रवेश करण्यासाठी युवांनी तयार व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे ‘पोलीस प्रशासनातील पहिले पाऊल’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडे व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे व डॉ. संग्राम पाटील यांनी सहभाग घेतला होता. सुरेश खोपडे यांनी समाजातील विविध स्तरावरील लोकांशी व्यवहार करताना घ्यायची भूमिका, त्यामागील नैतिक अधिष्ठान याविषयी PSI म्हणून निवड झालेल्या 45 तरुणांशी संवाद साधला. गेली वीस वर्ष कष्टकरी लोकांच्या समस्यांचा जवळून अभ्यास करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात राजमुद्रा अकॅडेमी व निर्माणच्या संदीप देवरे, अद्वैत दंडवते, सागर पाटील, महेश जोशी आणि ज्ञानेश मगर यांचा सहभाग होता.  

No comments:

Post a comment