'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 13 October 2012

निर्माणच्या खानदेशगटाची ‘लोकसंघर्ष मोर्चा’ च्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास बैठक


संदीप देवरे
लोकसंघर्ष मोर्च्या च्या अध्यक्ष आणि गेली अनेक वर्ष आदिवासींच्या प्रश्नावर आंदोलनात्मक मार्गानी काम करणार्‍या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आंदोलन समजून घेताना’ या  विषयावर निर्माणच्या संदीप देवरे आणि खानदेश ग़टाने नंदूरबार मधील ‘तळोदा’ या गावात तीन दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमचे नुकतेच पार  पडलेले आंदोलन विशेष यशस्वी ठरले नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलने नेहमी अकार्यक्षम ठरतात असे मत तरुणांमध्ये तयार होऊ नये म्हणून मोर्चे आणि आंदोलने यशस्वी आणि अयशस्वी का ठरतात, त्याचे स्वरुप नेमके काय असते, कोणते प्रश्न आंदोलनाने सुटू शकतात, याविषयीची परवानगी कशी मिळवावी याविषयी चर्चा करणे ही या कार्यशाळेची मध्यवर्ती कल्पना होती. याला निर्माणचे एकूण 25 तरुण सहभागी झाले होते. कार्यशाळेदरम्यान या तरुणांनी आदिवासी गावांमध्ये राहून वनहक्काचा प्रश्न समजून घेण्याच्या दृष्टीने काही सभा घेतल्या. प्रश्नावलीच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न शांततामय मार्गाने तर काही प्रश्न हे संघर्षात्मक मार्ग पत्करुन मार्गी लावावे लागतात. या कार्यशाळेच्या निमित्ताने निर्माणींना आंदोलनाच्या पध्दतीची तोंड ओळख झाली

No comments:

Post a Comment