'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012

वाचा, वाचा, नाही तर...


आपल्या अनुभवांतून आपले शिक्षण होत असते. अधिक व्यापक शिक्षण होण्यासाठी आपण इतरांच्या अनुभवांतूनही शिकण्याचा प्रयत्न करतो. निर्माणींच्या अनुभवाची देवाणघेवाण शिबिरांतून, चर्चेतून, सीमोल्लंघनमधून होतच असते. आपल्या शिक्षणाची व्यापकता याहीपेक्षा कशी वाढवता येईल?

आपल्या सर्वांचे लाडके गुरू (व त्याहीपेक्षा अधिक मित्र) नंदा काका आपल्या वैचारिक स्पष्टतेसाठी तात्कालिक विषयाला सांयुक्तिक असे लेखन त्यांच्या प्रचंड अनुभव, वाचन, चिंतनाच्या संचितातून करणार आहेत. तसेच दर सीमोल्लंघनमध्ये आपल्याशी एका नव्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे आपल्यातीलच एक निर्माणी. 

नायानांचे गुरू नेहमी म्हणायचे, ‘वाचा, वाचा, नाही तर तसेच पास होऊन जाल’. आपलेही आयुष्य केवळ खेळण्या-बागडण्यात जायचे नसेल, तर आजच वाचनाला सुरुवात करूयात.

No comments:

Post a comment