'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012
उकल समितीची स्थापना
निर्माण शिक्षणप्रक्रिया स्थापन होऊन आता ६ वर्ष झाली असून ३५० निर्माणी शिबिरांच्या प्रक्रियेतून गेले आहेत. तसेच निर्माण ५ चे १५० निर्माणी पुढल्यावर्षी येऊ घातले आहेत. ह्या शिक्षणप्रक्रियेच्या कामाला एक निश्चित संरचना देण्याची गरज आता जाणवू लागली आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून निर्माण उकल समिती स्थापन करण्याचे वर्कशॉपमध्ये ठरवण्यात आले. त्यातील सदस्यांची निवड वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या निर्माणींनी एकमताने केली.
निर्माणींना प्रक्रियेविषयी किंवा इतर निर्माणींसोबत मतभेद (निर्माणच्या कक्षेतील) असतील तर ते खालील टप्प्यांमध्ये सोडवता येऊ शकतात.
१. मतभेद असणाऱ्या निर्माणींनी संवाद साधून
२. वरील मार्गाने स्वतःहून संवाद साधण्यास अडचण येत असेल तर उकल समितीतील सदस्य संवादपूल बनून मदत करतील.
पहिल्या वर्षी निर्माण उकल समितीचे सदस्य खालीलप्रमाणे आहेत –
१. वेंकी अय्यर
२. कल्याण टांकसाळे
३. प्रियदर्श तुरे (सोनू)
४. चारुता गोखले
५. अतुल गायकवाड
६. सायली तामणे
No comments:
Post a Comment