'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012

महेश लादे पाबळ विज्ञान आश्रमात रुजू

प्रथम या संस्थेत शिक्षण सामग्री विकसित करण्याचे काम हाताळण्याचा अनुभव घेतल्यानंतर शिक्षणातून रोजगार कसा निर्माण करावा याच्या शोधात महेश लादे पाबळ विज्ञान आश्रमात रुजू झाला आहे. प्रथम मध्ये दहा महिने १ली ते ५वी, १०वी तसेच hospitality चे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शिक्षण सामग्री विकसित करणे, त्याचे शिक्षकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यात सुधारणा करणे ही जबाबदारी त्याने सांभाळली. पाबळ येथे तो Department Of Science and Technology मध्ये जबाबदारी सांभाळणार आहे. पाबळ व प्रथमच्या अनुभवाचा फायदा त्याला त्याच्या गावातल्या मुलांना शिक्षण का द्यावे व कसे द्यावे याची स्पष्टता येण्यासाठी नक्कीच होईल. त्याला त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!        

No comments:

Post a Comment