'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

दिलगिरी


सीमोल्लंघन, ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘जेथे कमी तेथे आम्ही: सोलापूर निर्माणचा चिंचोलीवासीयांना दिलासा’ या बातमीत चिंचोली येथे झालेल्या शिबिरात सर्व महिलांचे Hemoglobin तपासण्यात आले असे लिहिण्यात आले होते. मात्र संबंधित निर्माणींनी दिलेल्या माहितीनुसार केवळ अॅनिमियाच्या संशयित महिलांचेच Hemoglobin तपासण्यात आले होते. घडलेल्या चुकीबद्दल सीमोल्लंघन दिलगीर आहे.

No comments:

Post a Comment