'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

मलेरियाच्या साथीला निर्माणच्या डॉक्टरांची साद


सर्च दवाखान्यात एक दिवस कोन्दावाही या आदिवासी गावचे मलेरियाचे पेशंट अचानक वाढले. अधिक चौकशी करता कोन्दावाहीत मलेरियाची जोरदार साथ येऊन २ लहान मुले दगावल्याने गावात भीतीचे वातावरण असल्याचे लक्षात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्चच्या वैद्यकीय चमूसोबत निर्माणचे डॉक्टर्स सुजय काकरमठ व वैभव आगवणे सर्व तयारीनिशी कोन्दावाहीला पोचले. पुढील २-३ दिवसांत त्यांनी कोन्दावाही व आजूबाजूच्या गावांतील तापाच्या सर्व रुग्णांची तपासणी केली. पहिल्याच दिवशी मलेरियाचे ५० रुग्ण मिळाले. ४३ जणांना ताबडतोब बसमधून सर्च रुग्णालयात आणून भरती करण्यात आले. ५ गंभीर रुग्णांची अतिदक्षता विभागात काळजी घेण्यात आली. सर्व रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना दवाखान्यातून सोडण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण घेताना रुग्णाची तपासणी व उपचार कसे करावेत हे शिकवले जाते. मात्र प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देताना याहीपलिकडे अनेक कौशल्यांची गरज भासते. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णाशी संवाद कसा साधावा, रुग्णाच्या परिस्थितीवरून गावातल्या आरोग्याच्या स्थितीचा अंदाज कसा घ्यावा, गावात साथ कशी पसरते, तिला वेगाने प्रतिसाद कसा द्यावा, त्यासाठी व्यवस्थापन कसे करावे या कॉलेज मध्ये सहसा न शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी निर्माणी काम करता करता नयी तालीम पद्धतीने शिकत आहेत.

No comments:

Post a Comment