'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

लिहिते व्हा: माझा शिक्षण प्रवासज्या वेळी प्रथमसोबत काम सुरु केले त्या वेळी शिक्षण क्षेत्रात काम करायचे इतकेच मला माहित होते. कारण माझ्या गावातील माझ्या कुठल्याच भावाला त्याची माणसे, शेती व गाव सोडून कुठे तरी रिक्षा ड्रायव्हर तर कुठे वॉचमन म्हणून काम करताना पाहिल्यावर मला सहन झाले नाही. ज्यावेळी आम्ही सोबत शाळेत होतो, खेळत होतो त्या वेळी बऱ्याचदा ती मुलं खेळात म्हणा वा अभ्यासात म्हणा माझ्या पुढेच होती. पण मझ्या कडे जे होते ते त्यांच्या कडे नव्हते आणि ते म्हणजे पैसे, मार्गदर्शन व माहिती देणारे वडील.

मी महेश लादे. मी ज्या वेळी प्रथमसोबत काम सुरु केले त्या वेळी शिक्षण क्षेत्रात काम करायचे इतकेच मला माहित होते. कारण माझ्या गावातील माझ्या कुठल्याच भावाला त्याची माणसे, शेती व गाव सोडून कुठे तरी रिक्षा ड्रायव्हर तर कुठे वॉचमन म्हणून काम करताना पाहिल्यावर मला सहन झाले नाही. ज्यावेळी आम्ही सोबत शाळेत होतो, खेळत होतो त्या वेळी बऱ्याचदा ती मुलं खेळात म्हणा वा अभ्यासात म्हणा माझ्या पुढेच होती. पण मझ्या कडे जे होते ते त्यांच्या कडे नव्हते आणि ते म्हणजे पैसे, मार्गदर्शन व माहिती देणारे वडील.

मी मागील त्या शिकवणीला माझ्या वडिलांनी पाठवले. तसेच माझ्या शिक्षणाकरिता त्यांनी देखील खूप धडपड केली, म्हणून कदाचित मी माझे Engineering पूर्ण  करू शकलो. पण सहज नोकरी लागल्यावर कुठे तरी जाणीव झाली कि आपल्याला आज जे इतके सहज मिळाले तेच इतरांना मिळाले का? आणि याच प्रश्नाला धरून मी शोध घेतला तर माझे ते मित्र माझ्याच कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांच्या घरी जाऊन पहिले तर एका खोलीत सहा लोकांचे कुटुंब राहत होते.

या सर्व कारणांमुळे आयुष्याचा शोध घेत असताना मला निर्माण मिळाले. तिथे मला जे उमजले ते हेच की माझ्या गावातील माझ्या मित्रांना गावात राहता नाही आले, याचे स्पष्ट कारण म्हणजे गावात त्यांना कुठलाही रोजगार उरला नव्हता. स्वतःचा कुठला छोटा मोठा उद्योग चालू करून पैसे मिळवण्या करता त्यांना कुठलेही कौशल्य/गुण आवगत नव्हते. म्हणून मी निर्णय घेतला कि आपल्या गावात जाऊन एक अशी शाळा काढायची जी फक्त पुस्तकी शिकवणार नाही तर याबरोबरच आपल्या सभोवतालच्या परिसरात स्वतःचं असं काम त्यांना करता यावं असं शिक्षण देईल. पण अशी शाळा उभे करणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही ही बाब मला स्पष्ट होती. आधी शिक्षण क्षेत्रात काम करत असणाऱ्या एखाद्या संस्थेमध्ये काम करावे व तेथून अनुभव घेऊन पुढे काय करता येईल ते पहावे, म्हणून मला सर्व प्रथम शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था दिसली ती म्हणजे प्रथम’. ‘प्रथमने देखील मला अगदी सहज म्हणजे कुठलाही अनुभव नसताना मला काम करण्याची व शिकण्याची संधी दिली. आज मला प्रथममधून जे शिकायला मिळाले ते कुठल्याच विद्यापीठातील शिक्षणाने मिळाले नसते याची देखील मला खात्री आहे. माझ्या या वेगळ्या वाटेवरील पहिला प्रकाश म्हणजे प्रथमच आहे. प्रथम मध्ये सुरवातीला मी सारिका ताई बरोबर Read India या उपक्रमात काम सुरु केले. या उपक्रमादरम्यान महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी चालत असणारे प्रथमचे जिल्हापरिषदेचे वर्ग पाहिले. तिथे प्रथमचे वर्ग कसे चालतात, जसे की गावतील जी मुलं शिकलेली आहेत किवा शिकतायत त्यांनी त्यांच्यापेक्षा खालच्या कक्षेत शिकत असणाऱ्या मुलांना नेमक्या कशा पद्धतीने शिकवावे, याचे प्रशिक्षण प्रथमचे cluster resource leader (CLR) देतात. CLR चे प्रशिक्षण कसे होते हे सर्व मला तिथे समजले. नंतर काही महिन्यांनी मला माधुरीच्या इंग्रजी या विषयाच्या टीम मध्ये काम करण्याची संधी मिळाली. इथे १ ली ते ५ वी तसेच Hotel management मधील मुलांकरता आभ्यासक्रम (Content) बनवणे, त्याचे शिक्षकांना (CLR ना) प्रशिक्षण देणे, शिक्षक आपण दिलेल्या प्रशिक्षणाप्रमाणेच गावातील स्वयंसेवकाला शिकवतात का व ते स्वयंसेवक गावातील मुलांना त्याच पद्धतीने शिकवतात की नाही याची पाहणी (Monitoring) करणे हे मुख्य काम मी करत होतो. प्रथम मध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे प्रथमचे काम हे सरकारी यंत्रणा वापरून चालते. हे माझ्या संगणकीय भाषेत सांगायचे झाले तर पूर्ण संगणक न बदलता फक्त नवीन आलेली Operating System किंवा Microprocessor टाकणे होय म्हणजे श्रम व पैसे कमी लागतील. 

आज जरी मी पाबळ विज्ञान आश्रमासोबत माझं पुढचं शिक्षण सुरु केले आहे तरी देखील मला खात्री आहे की मी काम सुरु केल्यावर माझ्या पाठीवर धैर्याची पहिली थाप ही प्रथमचीच असेल कारण मी आज प्रथमचे काम सोडले आहे, प्रथम किंवा प्रथमच्या माणसांशी असलेले नाते नाही.

मी प्रथमनंतर पाबळला यायचे ठरवले याचे काही मुख्य मुद्दे म्हणजे मला स्वतःला टेस्ट करायचे होते. कारण माझे आतापर्यंतचे आयुष्य हे शहरी भागात मित्र-मैत्रिणी यांच्या सोबत बिनधास्त, मजेत, तसेच फेसबुक, इंटरनेट व मोबाईल वर तासन् तास गप्पा अशा सर्व वातावरणात गेले आहे. पण माझ्या गावचे वातवरण असे नाही. फेसबुक तर सोडाच तिथे माझ्या मोबाईललादेखील रेंज नसते. यावेळी मला प्रश्न पडतो, की हे सगळं सोडून गावात जाऊन काम करणे व याचबरोबर स्वतःवर नवी बंधने लादून घेणे हे मला कितपत झेपेल? मला सतत हा विचार सतावत होता की मी माझ्या Comfort Zone च्या बाहेर जाऊन काम करू शकतो की नाही? आणि ते तपासायचे तरी कसे?. हा विचार माझ्या मनात घोळ घालत असताना मला पाबळ विज्ञान आश्रम यांचा एक मेल मिळाला तो म्हणजे पाबळने दंतेवाडा, छत्तीसगढ येथे काम सुरु केले आहे. मला पाबळच्या कामाची जाणीव आधीपासून होतीच. मी त्यांना विचारण्याचे धैर्य केले व त्यातून आज मला पाबळ विज्ञान आश्रम इथे काम करण्याची संधी मिळाली आहे. मला असं वाटतं की मला ज्या पद्धतीचे काम सुरु करायचे आहे त्यासाठी पाबळचा अनुभव हा महत्वाचा असेल. याचे कारण असे की हाताने काम करणे व त्या माध्यमातून स्वतःचा रोजगार कसा उभा करावा हे शिकता येईल आणि दुसरे म्हणजे त्या माध्यमातून मला स्वतःला तपासून पाहता येईल. कुठलीही गोष्ट एकदम सोडणे हे नक्कीच चुकीचे आहे ह्याची जाणीव मला आहे. पण कदाचित माझी निर्णय घेण्याची क्षमता अजून तरी विकसित झाली नाही असे मला वाटते. कदाचित मी घेतलेला निर्णय हा चुकीचा असेल पण या क्षणी मला तोच योग्य वाटतोय.

मला ४ नोव्हेंबर २०१२ ला विज्ञान आश्रमाने काम सुरु करण्याचे सांगितले होते पण मला वाटत होते की ही गोष्ट माझ्या घरच्यांना पटवून देण्या करता व त्यांची परवानगी मिळवण्या करता घरी जावे लागेल. त्यामुळे मी प्रथम चे काम सोडल्यावर घरी गेलो त्यांच्याशी माझ्या निर्णयासंबंधी चर्चा केली व त्यांना माझ्या कामाची पूर्ण कल्पना देऊनच विज्ञान आश्रम इथे काम सुरु केले. वेंकीने सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या आई वडिलांचा सहभाग असेल याची काळजी मी घेत आसतो जी सर्वांनीच घ्यावी असे माझे मत आहे. आपल्या कामाची चर्चा व त्यावर फक्त आपले विचार न मांडता त्यांचे विचार ऐकून घेणे व त्यावर आपले मत शांतपणे त्यांच्यासमोर मांडणे हे महत्वाचे आहे असे मला वाटते. त्यांच्या शंकांचं शांतपणे निरसन केलं तर आपल्या निर्णयात अधिक स्पष्टता येते हे मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे.

 महेश लादे

1 comment:

  1. Its really great! New generation is thinking seriously for their life and path to be chosen. These are the efforts required for sustainable development.

    ReplyDelete