'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

प्रियदर्श तुरे, पवन मिल्खे व सहकाऱ्यांची छत्तीसगढ मधील रुग्णालयांना भेटभविष्याबाबत पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या उद्देशाने प्रियदर्श तुरे, रश्मी अकोदे, पवन मिल्खे, कौशल्या शिंदे, धनश्री बागल यांनी बिलासपूर, छत्तीसगढ येथील जन स्वास्थ्य सहयोग या संस्थेला भेट दिली. गनियारी या बिलासपूर जवळच्या गावात वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांमधील तज्ञ डॉक्टरांनी १९९९ मध्ये जन स्वास्थ्य सहयोग या रुग्णालयाची सुरवात केली. कमी खर्चात दर्जेदार औषधे रुग्णसेवा , विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व दुर्धर रोगांवर उपचाराची सोय, ग्रामीण भागातील आरोग्यसेविकांचे प्रशिक्षण, तसेच दूरवरच्या गावात आरोग्य सेविकांच्या मदतीने चालणारे कम्युनिटी क्लिनिक यामुळे या रुग्णालयाला लोकमान्यता मिळाली आहे (दिवसाला २०० च्या वर रुग्ण). संस्थेच्या सुरुवातीच्या संस्थापकांपैकी डॉ. योगेश व डॉ. रमण यांनी निर्माणींना आपल्या अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन केले. निर्माणचे डॉ. सचिन बारब्दे, डॉ. अश्विनी महाजन व सेवान्कुरचे डॉ. अभिजित गादेवार हे याच रूग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू आहेत.
डॉ. प्रियदर्श तुरे, डॉ. पवन मिल्खे, डॉ. प्रशांत कुचानकर आणि डॉ. विराज यांनी दल्ली राजारा, छत्तीसगड येथील शहीद हॉस्पिटलला भेट दिली. खाणीतील मजूर कामगारांनी ठरविलेले आणि मजुरांनीच बाधुन दिलेले असे या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य. १९८३ मध्ये प्रसूती गृहापासून सुरु होऊन आज सुसज्ज बाह्य रुग्ण विभाग व १२० खाटांचे रुग्णालय अशी त्यात वाढ झाली आहे. येथील कामगार नेते श्री नियोगी यांच्या प्रयत्नांतून आणि डॉ. बिनायक सेन,  डॉ. गुणा, डॉ. कुंडू, डॉ. जाना व डॉ. गुहा यांच्या पाठिंब्याने सुरू झालेल्या रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया तसेच प्रशिक्षण यांची सोय आहे. डॉ. जाना यांनी तरुण डॉक्टरांना रुग्णालय आणि त्याच्या इतिहासाबद्दल अतिशय रंजक आणि तितकीच विचार करायला लावणारी माहिती सांगितली.
दोन्ही ठिकाणी बरेच प्रश्न, विचार घेऊन गेलेल्या या तरुण डॉक्टरांना काही उत्तरे मिळण्याच्या दृष्टीने नक्कीच दिशा मिळाली असेल.

No comments:

Post a Comment