'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

दिल्ली सामुहिक बलात्कार घटनेच्या निषेधार्थ नागपूर गटाद्वारे स्वाक्षरी मोहीम
              नुकत्याच दिल्लीत झालेल्या २३ वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार घटनेच्या निषेधार्थ नागपूरच्या निर्माण ५ गटाच्या १५ युवक-युवतींनी स्वतः पुढाकार घेऊन नागपूर येथे स्वाक्षरी मोहीम आणि candle march आयोजित केला होता. ही मोहीम सुरु झाल्यानंतर काही वेळातच नंदा काका, स्थानिक रहिवासी, वसतिगृहात राहणाऱ्या मुली, स्थानिक राजकीय नेते यांपासून ते नव्वद वर्षांच्या आजींपर्यंत सर्वांनी स्वाक्षऱ्या करून या मोहिमेस पाठिंबा दिला. या मोहिमेत चार तासांत तब्बल ६०० जणांनी स्वाक्षऱ्या करून या घटनेस निषेध दर्शविला. १५ युवांनी सुरु केलेल्या या मोहिमेत हळूहळू अनेक लोक सहभागी झाले आणि सुमारे ७०-८० जणांनी वेगवेगळे banners आणि घोषणांचा वापर करून शांततापूर्वक candle march काढला. हा निषेध सरकारपर्यंत पोचवण्यासाठी या स्वाक्षऱ्या लवकरच जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पाठवण्यात येतील. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन निर्माण ५ च्या गटाने केले होते आणि रंजन पांढरे या निर्माण ४ च्या मित्राने या गटाला आयोजनात मदत केली. निर्माल्य संकलन, चंद्रपूर दारूबंदी आंदोलन यांसारख्या सांघिक कृतींपाठोपाठच बलात्कारासारख्या नाजूक मुद्द्याला संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या या गटाचे अभिनंदन! 


No comments:

Post a Comment